राज्यात एकच उपमुख्यमंत्री असणार – रविशंकर प्रसाद
चंदीगड – हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच भाजपने मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यानुसार मनोहर लाल खट्टर रविवारी दोन वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, भाजप आज हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.
Chandigarh: Manohar Lal Khattar has been elected BJP’s legislative party leader. #Haryana pic.twitter.com/R1DPhZTKvL
— ANI (@ANI) October 26, 2019
भाजप आमदारांची आज चंदीगड येथे बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, मनोहरलाल खट्टर, भाजप नेते सुभाष बराला, पक्षाचे राज्य प्रभारी अनिल जैनसह नवनिर्वाचित आमदारही उपस्थित होते. यावेळी गोपाळ कांडा यांचे समर्थन घेणार नसल्याचे स्पष्टीकरण रविशंकर प्रसाद यांनी दिले.
Union Minister Ravi Shankar Prasad: We will go to meet the Governor, and request him to invite us to form the government. #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/lvy8vgQGM5
— ANI (@ANI) October 26, 2019
दरम्यान, हरियाणात जननायक जनता पक्षाने (जेजेपी) भाजपाशी युती करून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल जेजेपीला उपमुख्यंत्रीपद दिले जाणार आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.