Tim David & Kieron Pollard – इंडिया प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कोड ऑफ कंडक्टचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई इंडियन्सचा फलंदाज टीम डेव्हिड आणि फलंदाजी प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांना दंड ठोठावण्यात आला आहे. दोघांना मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
डेव्हिड आणि पोलार्ड यांनी 18 एप्रिल रोजी मुल्लानपूर येथे पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या कलम 2.20 अंतर्गत लेव्हल 1 नुसार गुन्हा केला होता.
पंजाबविरुद्धच्या मुंबईच्या डावाच्या 15व्या षटकात अर्शदीप सिंगचा एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी या चेंडूला वाईड दिले नाही. मात्र, एमआय डगआऊटमध्ये बसलेल्या पोलार्ड फलंदाजाला संकेत देताना दिसून आला. पोलार्डसोबत टीम डेव्हिड सूर्याला रिव्ह्यू घेण्याची विनंती करताना दिसला होता.