FIH Women’s Hockey Pro League 2023/24 : सलीमा टेटे हिच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघाला एफआयएच (FIH) प्रो लीग 2023-24 च्या युरोप टप्प्यातील पहिल्या सामन्यात निराशेचा सामना करावा लागला. अँटवर्पमध्ये बुधवारी विमेन इन ब्लूला अर्जेंटिनाविरुद्ध 5-0 असा पराभव स्वीकारावा लागला.
FULL TIME: Not the start we wanted, but we’ll regroup and come back stronger.
Let’s keep our spirits high and continue to support our team! 💪🇮🇳India 🇮🇳 0 vs Argentina 🇦🇷 5
Goal Scorers:
13′ Gorzelany Agustina (PC)
24′ Raposo Valentina (PC)
41′ Miranda Victoria
53′ 59’… pic.twitter.com/CwtV5hXLGC— Hockey India (@TheHockeyIndia) May 22, 2024
अर्जेंटिनासाठी ऑगस्टा गोर्झिलेने (13व्या मिनिटाला), व्हॅलेंटिना रापोसोने (24व्या मिनिटाला), व्हिक्टोरिया मिरांडाने (41व्या मिनिटाला) आणि ज्युलिएटा जानकुनासने (53व्या आणि 59व्या मिनिटाला) गोल केले.
FIH Hockey Pro League 2023/24 : पेनल्टी शूटआऊटमध्ये भारतीय पुरूष संघाची अर्जेंटिनावर मात…
भारतीय संघ येथे प्रथमच नवीन प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या प्रशिक्षणाखाली खेळत आहे. या सामन्यात माजी कर्णधार आणि गोलरक्षक सविताला बाहेर ठेवताना बिच्चू देवीला गोलकीपिंगची संधी देण्यात आली होती. भारतीय महिला हॉकी संघ सध्या FIH प्रो लीग 2023-24 च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.