Dombivali blast : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2 मधील अमुदान केमीकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात सहा कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज गुरुवारी दुपारी या कंपनीत बाॅयलरचा स्फोट झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली होती.
या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, परिसरातील दोन किमी अंतरावरील जमीन हादरली. काही घरांच्या आणि रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फुटल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या दुर्घटनेत जवळपास 50 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH | Thane, Maharashtra: On the Dombivali boiler blast incident, Namdev Choudhary, Chief fire officer says, “The explosion occurred around 1.15 pm. We have recovered 4 bodies so far. The fire is under control and is being extinguished…” https://t.co/aTBW13pY3F pic.twitter.com/ZKc02YuTUR
— ANI (@ANI) May 23, 2024
दरम्यान, अमुदान केमिकल कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे. सुरुवातीला आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अडथळा येत होता. आगीची तीव्रता भीषण व धुराचे लोळ परिसरात पसरत असल्याने अग्निशमनच्या जवानांना आग विझवताना कसरत करावी लागली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ प्रशासनाला नियंत्रण मिळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तीन तासानंतरही हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
#WATCH | Maharashtra: Four people died, 39 injured in the Dombivali boiler blast incident: Thane Municipal Corporation
(Visuals from the spot) pic.twitter.com/gS8nCkliAi
— ANI (@ANI) May 23, 2024
स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर परिसरातील दुकानांच्या काचा फुटून रस्त्यावर पडल्याचं दिसून आलं. या बॉयलरच्या स्फोटाचा आवाज 3 ते चार किलोमीटरपर्यंत ऐकू आला आणि आजूबाजूच्या घरांच्या, हॉटेल्स आणि ऑफिसच्या काचा फुटल्याचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियातून समोर आले आहेत.
#WATCH | Maharashtra: Fire breaks out due to a boiler explosion in a factory located in the MIDC area in Dombivli. More than four fire tenders rushed to the site.
Details awaited. pic.twitter.com/gsv1GCgljR
— ANI (@ANI) May 23, 2024
2016 मध्ये अशाच स्फोटात 12 जणांचा मृत्यू –
26 मे 2016 रोजी एमआयडीसी फेज 2 मधील प्रोबेस कंपनीत स्फोट झाला होता. या घटनेची तीव्रता अधिक असल्याने कंपनीत काम करणाऱ्या 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या 215 जणांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. पंचनामे झालेल्या मालमत्तेचा आकडा साधारणपणे 7 कोटी 43 लाख सत्तर हजार रुपयांपर्यंतचा होता.