IPL 2024, Glenn Maxwell : आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात संजू सॅमसनच्या संघाने आरसीबीचा चार गडी राखून पराभव करत क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला. आता 24 मे रोजी राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
कार्तिकशी साधली बरोबरी….
एलिमिनेटर सामन्यात आरसीबी संघाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आपला प्रभाव सोडण्यात अपयशी ठरला. ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात गोल्डन डकचा बळी ठरला आणि यासह मोसमात तो चौथ्यांदा शून्यावर बाद झाला. यासह 35 वर्षीय खेळाडूच्या नावावर एक लाजिरवाणा (नकोसा) विक्रम नोंदवला गेला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा गोल्डन डकचा बळी होण्याच्या बाबतीत तो दिनेश कार्तिकच्या बरोबरीने पोहोचला आहे. आयपीएलमध्ये 18 वेळा यष्टीरक्षक फलंदाज कार्तिक हा पहिल्या चेंडूवर बाद झाला आहे. त्याच वेळी, मॅक्सवेल देखील बुधवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात 18 व्यांदा गोल्डन डकवर बाद झाला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज..
दिनेश कार्तिक 18
ग्लेन मॅक्सवेल 18
रोहित शर्मा 17
पियुष चावला 16
सुनील नरेन 16
IPL 2024 : ‘जे कोणी करू शकलं नाही ते विराट कोहलीने करून दाखवलं; लवकर OUT होऊनही रचला इतिहास…
एकाच मोसमात चौथ्यांदा शून्यावर बाद…
आयपीएलचा 17वा सीझन ऑस्ट्रेलियन दिग्गजांसाठी काही खास नव्हता. मॅक्सवेलला 10 सामन्यांत केवळ 52 धावा करता आल्या. या मोसमात तो चार वेळा गोल्डन डकचा बळी ठरला. राजस्थानविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात अश्विनने त्याला ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. ही त्याची आतापर्यंतची फलंदाजीतील सर्वात खराब कामगिरी आहे. आयपीएल 2024 मध्ये, गोलंदाजीत मॅक्सवेलने 8.0 च्या इकॉनॉमी रेटने धावा खर्च करताना केवळ सहा विकेट घेतल्या.
आयपीएलच्या एक हंगामात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज
जोस बटलर : 5 वेळा, राजस्थान रॉयल्स (2023)
हर्शेल गिब्स : 4 वेळा,डेक्कन चार्जर्स (2009)
मिथुन मनहास : 4 वेळा, पुणे वॉरियर्स इंडियन्स (2011)
मनीष पांडे : 4 वेळा, पुणे वॉरियर्स इंडियन्स (2012)
शिखर धवन : 4 वेळा, दिल्ली कॅपिटल्स (2020)
इऑन मॉर्गन : 4 वेळा, कोलकाता नाइट रायडर्स (2021)
निकोलस पूरन : 4 वेळा, पंजाब किंग्स (2021)
दिनेश कार्तिक : 4 वेळा, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2023)
ग्लेन मॅक्सवेल : 4 वेळा, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (2024)
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले फलंदाज….
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजाच्या यादीतही मॅक्सवेल याने चौथे स्थान मिळवले आहे. या फाॅरमॅटमध्ये तो 32वेळा शून्यावर बाद झाला आहे. या यादीत सुनील नरेन पहिल्या क्रमाकांवर आहे.
सुनील नरेन 44
ॲलेक्स हेल्स 43
राशिद खान 42
ग्लेन मॅक्सवेल 32
पॉल स्टर्लिंग 32