मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. यावेळी नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. यावेळी मोदी काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून “मी मुंबईत असेन…’ असं म्हंटलं आहे. त्यामुळे आजच्या दौऱ्याची उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचवली आहे.
काय आहे? पंतप्रधान मोदींच मराठी ट्विट…
“मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल’. या आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी स्थापन होऊन आता जवळपास अडीच वर्ष होत आली आहेत असं असताना भाजपनं मिशन 2024 च्या नावाखाली मोर्चेबांधणी सुरू केली. आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे.