मुंबई – वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या
आंदोलनाचा एक फोटो शेअर करून आपण याविषयी का बोलत नाही, एवढेच वाक्य प्रसिद्ध
पॉप गायिका रिहानाने ट्विट केले. कंगना राणावतने लागलीच आपला मोर्चा रिहानाकडे वळवला. रिहानाचे ट्विटनंतर कंगनाने लांबलचक पोस्ट लिहित उत्तर दिले. या दोघांच्या वादात पंजाबी गायक व अभिनेता दिलजीत दोसांज उडी घेत रिहानासाठी एक गाणं तयार केलं होत.
Best way to explain it is with a simple, fun son g. #IndiaTogether pic.twitter.com/zFFoc1PRFn
— Kalpesh Patel (@RanvirShorey) February 3, 2021
यामुळे भडकलेल्या कंगनाने दिलजीतला खलिस्तानी संबोधले. सध्या ट्विटरवर शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या गटामध्ये आणि मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्यामध्ये चांगला वाद सुरु आहे. हा वाद सुरूच असतांना ट्विटर बॉलीवूड सेलेब्स मध्ये यावरून दोन गट पडल्याचे दिसून आले आहे. याच संदर्भात आता रणविर शौरी यानं या प्रकरणावर एक गाणं तयार केलं आहे. त्यामध्ये ग्रेटा थनबर्ग, रिहाना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य लोकांचाही उल्लेख करण्यात आला आहे.
रणविर शौरीनं ट्विट करत व्हिडीओ शेअर केला. यामध्ये तो गिटार वाजवतानाही दिसत आहे.’रिहाना तो बहाना, किसानों के कंधे से बंदूक चलाना है। ग्रेटा तो अनपढ़ है, मोदी को शर्मिंदा करके पप्पू को पीएम बनाना है’ असं म्हणत त्यानं आपल्या गाण्यातून ग्रेटा थनबर्ग, रिहाना यांच्यावर निशाणा साधला आहे.