-->

आजचे भविष्य (शनिवार, ६ फेब्रुवारी २०२१)

मेष : पैशाची ऊब वाढेल. वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्व कळून येईल. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.

वृषभ : प्रवास घडेल. घरात खरेदीचे योग. पाहुण्यांची ये जा राहील. आवडत्या कामात महिलांना रस वाटेल.

मिथुन : स्वभावाला साजेसे ग्रहमान लाभल्याने निखळ आनंद जीवनाचा घ्याल. इतरांनाही त्यात सहभागी कराल.

कर्क : व्यवसायात पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळं मिळेल. नवीन कामे मिळतील. वरिष्ठ जादा सवलती देतील.

सिंह : खेळत्या भांडवलाची पूर्तता झाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यवहारांना चालना मिळेल.

कन्या : महत्वाच्या कामासाठी तुमची निवड होईल. आप्तेष्ट नातेवाईक यांच्या भेटीचे योग. मनसोक्त खर्च कराल.

तूळ : तुमच्या व्यक्तिमत्वांची छाप दुसऱ्यांवर पडेल.मानसिक स्वास्थ जपलेत तर बरेच काही साध्य करू शकाल.

वृश्‍चिक : व्यवसायात कामाचे योग्य नियोजन केलेत तर यशाचे प्रमाण वाढेल. तडजोडीचे धोरण ठेवलेत

धनु : नवीन कार्यपद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करून उलाढाल व फायदा वाढवण्याचा विचार करा.

मकर : नोकरीत सहकाऱ्यांकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता कामे केलीत तर समाधान मिळेल.

कुंभ : स्वतःची कुवत ओळखून दगदग धावपळ करा. कामानिमित्ताने प्रवासयोग. कामाची जबाबदारी पडेल.

मीन : गोड बोलून इतर व्यक्तिंची मदत कामाला होईल. दगदग धावपळही वाढेल. नोकरीत लाभ होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.