माजी मिस जम्मू आणि अभिनेत्री अनारा गुप्ता लवकरच तिच्या प्रॉडक्शन हाऊसच्याखाली भोजपुरी चित्रपटात झळकणार आहे. यासाठी अनाराने जय्यत तयारी सुरू केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी ती तिच्या गाण्यांचा पहिला अल्बम तिच्या प्रॉडक्शन हाऊसखाली लॉंच करू शकते. अनारा म्हणाली, “हो, या चित्रपटासाठी माझी तयारी सुरू आहे. आता लॉकडाऊन सुरू असल्याने मला सर्व काही सांगता येणार नाही. मी आधीपासूनच एजी फाउंडेशन अंतर्गत काम करत आहे आणि चित्रपटही या बॅनरखाली तयार करण्यात येणार आहे.
अनारा म्हणाली, आजचा तरुण जे पाहू इच्छित आहे आणि ज्या प्रकारचे चित्रपट येत आहेत, ते खूपच जबरदस्त आहेत. आज अभिनेता किंवा अभिनेत्री नव्हे तर विषयाला प्राधान्य दिले जात आहे. मलाही तेच हवे आहे. जेव्हा कथा दमदार असते, तेव्हा आपण हिट होतोच. आपल्याकडे कथा नसल्यास प्रेक्षकांसमोर जाऊ शकत नाही. त्यामुळे मी निश्चितच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करेन, असे अनाराने सांगितले.
दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान मला काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती.
त्यातच मला गाण्याची आवड आहे, पण सार्वजनिकरीत्या कधीच गाणे म्हटले नाही. लॉकडाऊन दरम्यान मी इंस्टावर काही गाणी शेअर केली. त्यानंतर मला मिळालेला प्रतिसाद पाहून मी गायक म्हणूनही काहीतरी करू शकते, असा मला विश्वास निर्माण झाला, असेही तिने मुलाखतीत सांगितले.