पिंपरी -“भाऊ’ म्हटला नाही या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 16) रात्री रोकडे वस्ती, चिखली येथे घडली.
निखिल चंद्रकांत गाडेकर (वय 22, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी रविवारी (दि. 17) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोज हाडे, करण रोकडे, मुंग्या रोकडे, सुरज खपाले (सर्व रा. चिखली) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी मनोज याने शनिवारी रात्री फिर्यादी गाडेकर यांना फोन करून भेटण्यास बोलावले आणि “तू करण रोकडे याला “भाऊ’ का बोलत नाहीस’ असे म्हणत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडेकर यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी त्यांना मारहाण केली.