हॉटेल मालकाची दोघांना लोखंडी रॉडने मारहाण

पिंपरी – गाडी पार्किंगच्या कारणावरुन हॉटेल मालक व त्याच्या कामगारांनी मिळून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण केली व कारची तोडफोडही केली. ही घटना दि. 25 मे रोजी दुपारी दोन वाजता वाकड येथील हॉटेल लिवार्डसमोर घडली.
याप्रकरणी ओंकार पांडुरंग पाटील (वय-27 रा. पिंपळे सौदागर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरुन, हॉटेल लिवार्डचे मालक व त्यांच्या कामगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, फिर्यादी हे त्यांचे मित्र अझर मुलानी यांच्यासोबत जेवनाच्या बिलाचे पैसे देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी कार (क्र. एमएच 16/एटी/ 4117) ही हॉटेल लिवार्ड समोर पार्कींग केली असता पार्किंगच्या कारणावरुन हॉटेल लिवार्डचे मालक व त्यांच्या तिन कामगारांनी फिर्यादीच्या हातावर व पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच ओंकार यांचा मित्राच्या डोक्‍यात लोखंडी रॉडने मारुन त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणी अधिक तपास वाकड पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)