पिंपरी – दुकानात पाणी घेण्याच्या बहाण्याने येवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना जुनी सांगवी येथील एका दुकानात दि. 22 मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी 37 वर्षीय पिडीत महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, अविनाश सुभाष मारणे (वय-43, रा. जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, फिर्यादी पिडीत महिलेच्या दुकानात आरोपी अविनाश हा पाणी घेण्याच्या बहाण्याने आला व पिडीत महिलेचा विनयभंग केला.