पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची योग्यता प्रमाणपत्राच्या कामकाजाची जागा अधिग्रहीत करण्यात आल्याने २६ फेब्रुवारी रोजी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे कामकाज होणार नाही.
पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्वेंशन सेंटर, मोशी पुणे येथे २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’च्या आयोजनाकरिता आटीओकडून ही कार्यवाही करण्यात आली आहे. योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाकरीता २६ फेब्रुवारी रोजी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने शनिवारी (दि. २ मार्च) रोजी तपासणीकरिता सादर करावीत, अशी माहिती आरटीओकडून देण्यात आली आहे.
१५ वर्षानंतरची वाहने अथवा वाहतूकदार वाहनांन आरटीओकडून वाहन योग्यता प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते नसेल आरटीओकडून कारवाइ केली जाते. अनेक वेळेला वाहने खराब असतानाही रस्त्यावरून पळवली जातात. परिणामी अपघाताला सामोरे जावे लागते. हे दुर्घटना टाळण्यासाठी वाहन योग्यता प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे.
त्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्वेंशन सेंटर, मोशी या ठिकाणी चाचणी द्यावी लागत आहे. मात्र सध्या या ठिकाणी ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’चे आयोजन केले आहे. २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले ठेवले आहे. ते पाहण्यासाठी शहरासह शहराबाहेरून नागरिक गर्दी करत आहेत.
एक्स्पोसाठी जागा घेतल्यामुळे सध्या वाहन योग्यता चाचणी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आरटीओने वाहन योग्यता प्रमाणपत्राची कार्यवाही तात्पुरती थांबवली आहे. २६ ब्रुवारी रोजी आरक्षित केलेल्या वाहन मालकांनी त्यांची वाहने शनिवारी (दि. २ मार्च) रोजी तपासणीकरिता सादर करण्याचे आवाहन आरटीओने केले आहे. त्यानंतर पुढील चाचणी होऊन प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती आरटीओने दिली आहे.