पिंपरीत पुन्हा घरफोडी; लॅपटॉप, मोबाईल व इतर कागदपत्रांची चोरी

पिंपरी – बंद घराचे कुलुप उघडून घरातील लॅपटॉप, मोबाईल व इतर कागदपत्रे चारुन नेली. ही घटना दि. 25 मे रोजी पिंपरी येथील शनिमंदीराच्या समोर असलेल्या अपार्टमेंट मध्ये घडली. याप्रकरणी रुपाकुमारी ललन तिवारी (वय-32) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी या 25 मे रोजी सकाळी आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला व घरातील 38 हजार 500 रुपये किंमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप, लिनोव्हा कंपनीचा मोबाईल व इतर कागदपत्रे चोरुन नेले. रात्री घरी आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. याबाबत अधिक तपास पिंपरी पोलीस ठाण्याचे सपोनि शेख हे करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×