नवी दिल्ली : दररोज अशा काही विचित्र घटना समोर येतात, ज्या ठळक बातम्या बनतात. नाही, आम्ही इलॉन मस्कच्या कोणत्याही ट्विटबद्दल बोलत नाही, तर आम्ही भारतातील एका व्यक्तीबद्दल बोलत आहोत ज्याने करोडो रुपयांची आपली चकचकीत बीएमडब्ल्यू कार चक्क नदीत फेकली. त्यामागचे कारणही इतके भन्नाट होते की तुम्ही ऐकून थक्क व्हाल! काय आहे हे प्रकरण नेमके, चला, जाणून घेऊया.
मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण बेंगळुरूचे आहे, जिथे आपल्या आईच्या मृत्यूने दु:खी झालेला एक माणूस त्याच्या चकचकीत बीएमडब्ल्यू कारमध्ये श्रीरंगपटना येथील कावेरी नदीच्या काठावर पोहोचला. यानंतर कारमधून खाली उतरल्यानंतर त्यांनी ती गाडी नदीच्या जोरदार प्रवाहात ढकलून दिली. अहवालानुसार, त्या व्यक्तीने कावेरी नदीत टाकलेल्या BMW X6 SUB ची किंमत 1.3 कोटी रुपये होती.
अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा त्या व्यक्तीने आपली एसयूव्ही कावेरी नदीत टाकली, तेव्हा त्याला त्याच्या आईच्या मृत्यूने खूप दु:ख झालेले होते आणि तो खूप उदास होता. नदीच्या आजूबाजूला उपस्थित मच्छीमार व जाणाऱ्यांनी ही आलिशान कार नदीत वाहून गेल्याचे पाहिले असता त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
कारचा अपघात झाल्याचे पोलिसांना समजले होते. एक व्यक्ती आत अडकली आहे या भीतीने पोलिसांनी पथकासह त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि खूप प्रयत्नानंतर गाडी नदीतून बाहेर काढली. यानंतर पोलिसांनी वाहतूक विभागाकडून माहिती गोळा केली आणि बंगळुरूच्या महालक्ष्मी लेआउटमध्ये राहणाऱ्या कारच्या मालकाचा शोध घेतला.
पोलीस चौकशीत या व्यक्तीने या विचित्र कृत्याबद्दल फारसे काही सांगितले नसले तरी त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, आईच्या मृत्यूनंतर तो नैराश्यात गेला होता, त्यामुळे त्याने त्याची बीएमडब्ल्यू एसयूव्ही नदीत ढकलून दिली. यानंतर कुटुंबीयांचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला सोडून दिले.