केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 32, 498 झाली आहे. एकूण संसर्गाच्या 0.08 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. सध्या देशातील रिकवरी रेट 98.71 टक्क्यांवर आला आहे.
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील करोना रुग्णांच्या संख्येत नव्याने वाढ होऊ लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच मागील २४ तासांत देशभरात करोनाचे एकूण ७,२४० नवीन रुग्ण आढळले असून नव्या बाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी सुमारे 40 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात कोविडमुळे एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात देशात एकूण 4 कोटी 31 लाख 97 हजार 522 जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर या महासाथीमध्ये 5 लाख 24 हजार 723 लोकांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 32, 498 झाली आहे. एकूण संसर्गाच्या 0.08 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. सध्या देशातील रिकव्हरी रेट 98.71 टक्क्यांवर आला आहे. मात्र, गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3591 रुग्ण बरे झाले असून, ही संख्या नवीन रुग्णांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 4 कोटी, 26 लाख, 40 हजार, 301 लोकांनी करोनावर मात केली आहे.
देशातील डेली पॉजिटिविटी रेट आता 2.13 टक्के तर विकली पॉजिटिविटी रेट 1.31 टक्के झाला आहे. आतापर्यंत (8 जूनपर्यंत) देशात एकूण 85.38 कोटी नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 3,40,615 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत देशभरातील आतापर्यंत एकूण 194.59 कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.