पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आरोग्य केंद्र आणि इंडियन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 एप्रिल रोजी “किशोरवयीन मुले, त्यांच्या समस्या व पालक’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळा विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाच्या सभागृहात दुपारी 3 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. कार्यशाळेचे उद्घाटन कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते होईल.
पहिल्या सत्रात किशोरवयीन मुलांमध्ये होणारे मनो-सामाजिक व शारीरिक बदल या विषयावर डॉ. शैलजा माने विचार मांडणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या सत्रात किशोरवयीन मुलांबरोबर पालकांनी वागण्याच्या पद्धती या विषयावर डॉ. वैशाली देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. शेवटी पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जाणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.