मुंबई – आयपीएल स्पर्धेतील जवळपास सर्वच संघांना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात कधी दाखल होतील याची प्रतिक्षा लागली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानात मालिका खेळत आहे.
या मालिकेत डेव्हीड वॉर्नर, मिशेल मार्श व ऍरन फिंच यांच्यासह असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांना आयपीएल स्पर्धेतील विविध संघांनी खरेदी केले आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेमुळे त्यांना आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये सहभागी होत आलेले नाही. आता ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान यांच्यातील मालिका अंतिम टप्प्यावर आलेली असल्यामुळे हे खेळाडू लवकरच भारतात दाखल होतील.