पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या असून, महत्त्वाच्या परीक्षा दि. 23 एप्रिलपासून सुरू होत आहेत. सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असून, त्यादृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांतील महाविद्यालयांमधील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या माध्यमातून घेतली जाते. विद्यापीठाने सर्व परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार येत्या 23 एप्रिलपासून द्वितीय व तृतीय कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या परीक्षा सुरू होणार आहेत.
तर पदव्युत्तर पदवी विद्यान शाखा (एम.एस्सी.) अभ्यासक्रमाच्या परीक्षा 14 मेपासून सुरू होणार आहेत. तसेच इंजिनिअरिंगच्या परीक्षा 15 व 16 मे पासून सुरू होणार आहेत. फार्मसी, बीबीए, एमबीए, विधी आदी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही प्रसिद्ध झाले आहे.
दरम्यान, विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज वेळेत आहेत आहेत.
तसेच काही परीक्षा सुरू झाल्या असून महत्त्वाच्या परीक्षांना येत्या 23 तारखेपासून सुरूवात होत आहे. सर्वांच्या सहकार्याने निकालही वेळेत लावण्याच्या विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यामुळे करोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक कॅलेंडर रुळावर येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.