इतिहासात पहिल्यांदाच Oscars 2021 पुढे ढकलला जाणार?

'ऑस्कर' अकादमीचे लवकरच नवीन वेळापत्रक होणार प्रदर्शित

मुंबई – कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या ‘ऑस्कर’ पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. कलाकारांची मेहनत, अभिनय कलेने गाठलेली एक वेगळी उंची आणि तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक बहरलेली ही चित्रपट साकारण्याची कला नेमकी किती उंची गाठू शकते याची अनुभूती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून दिसून येते.

दरम्यान, 1929 मध्ये सुरू झालेला ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं यंदाचं 93 वे वर्ष आहे. मात्र आता हा पुरस्कार सोहळा पुढे ढाकळ्याची वेळ आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना व्हायरसने जगामध्ये थैमान घातले आहे. जवळजवळ प्रत्येक देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. अशात अनेक स्पर्धा, कार्यक्रम, इव्हेंट्स एक तर रद्द झाले अथवा पुढे ढकलले. आता याचा फटका मानाच्या ‘ऑस्कर पुरस्कारा’ लाही बसला आहे. त्यामुळे आता प्रथमच 93 वर्षांमध्ये हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याक्बाबत चर्चा सुरू आहे.

28 फेब्रुवारी 2021 रोजी होणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा आता मे-जून 2021 पर्यंत पुढे ढकलण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध वृत्तानुसार, पुढच्या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्याला अजून पुढे ढकलण्याबाबत आयोजक चर्चेत आहेत. ऑस्करसाठी एंट्रीज पाठविण्याची प्रक्रिया सहसा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलमध्ये सुरू होते. नामांकन शॉर्ट लिस्ट नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान जाहीर होते व जानेवारीत ज्युरी सदस्य मतदान करतात. मात्र आता ही सर्व प्रक्रिया बदल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.