Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चाहते तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतेच प्रियांकाने तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपटाची घोषणा केली आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आगामी चित्रपटात प्रियांका हॉलिवूड अभिनेता कार्ल अर्बनसोबत काम करणार आहे.
एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिलं आहे ,”मला आशा होती की जर मी जिवंत राहिले आणि देवाची इच्छा असेल तर आपल्याला देखील समुद्री डाकू बनण्याची संधी मिळेल”. ‘द ब्लफ’ हा सिनेमा काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. आता अभिनेत्रीने या सिनेमावर भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने वर्कआऊट करतानाचा एक मिरर सेल्फी इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं,”सेटवर मी पुन्हा आले असून काम सुरू केलं आहे”.
View this post on Instagram
रहस्यमय चित्रपट
‘द ब्लफ’चे कथानक 19 व्या शतकातील कॅरेबियन फेजवर आधारित असून हा एक रहस्यमय चित्रपट आहे. एका माजी महिला समुद्री डाकूची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. कुटुंबियांची रक्षा करण्यासाठी धडपडणारं प्रियांकाचं पात्र आहे. फ्रँक ई फ्लावर्स या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. प्रियांका चोप्राच्या ‘The Bluff’ या सिनेमाचं शूटिंग ऑस्ट्रेलियामध्ये होणार असल्याची चर्चा आहे.
‘द ब्लफ’ या सिनेमासह प्रियांका ‘To Kill A Tiger’ या माहितीपटामुळे चर्चेत आहे. या माहितीपटाची ती निर्मिती करणार आहे. याशिवाय ती ‘हेड ऑफ स्टेट’ आणि ‘सिटाडेल 2’ या सिनेमांच्या माध्यामातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय प्रियांका अभिनेत्री आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्यासोबत बहुप्रतिक्षित ‘जी ले जरा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे.