Oscar Award 2024| मनोरंजन विश्वातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्करकडे पाहिले जाते. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यात ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. मागील वर्षी RRR चित्रपटाने ऑस्करमध्ये भारताचे नाव गाजवले होते. मात्र सर्वात पहिल्यांदा भारतात ऑस्कर पुररस्कार कोणी मिळवला? हे आपण जाणून घेऊयात…
कोण आहेत भानु अथैया? Oscar Award 2024|
भारताला सर्वात आधी ऑस्कर पुरस्कार हा एका महिलेने मिळवून दिला होता. ही एक कौतुकास्पद बाब आहे. प्रसिद्ध वेशभूषाकार भानु अथैया या ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता. 1983 मध्ये 55 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी त्यांनी पहिला ऑस्कर जिंकला. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, अभिनेता आणि दिग्दर्शकासह आठ ऑस्कर पुरस्कार गांधी सिनेमाने मिळवले होते.
या चित्रपटात प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. तर भानु अथैया यांनी केलेल्या वेशभूषांमुळे त्या विशेष गाजल्या. या चित्रपटात ओम पूरी, रोहिणी हट्टंगडी, सईद जाफरी यांसारख्या कलाकार देखील झळकले होते. या सर्व कलाकारांच्या कपड्यांचे डिझाइन्स या भानू अथैया यांनी केले होते.
‘लगान’ चित्रपटासाठी पुन्हा ऑस्करचे नामांकन Oscar Award 2024|
त्यानंतर 2001 साली आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटासाठी त्यांना पुन्हा एकदा ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मात्र त्यांचा हा पुरस्कार थोडक्यात हुकला. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांसाठी वेषभूषाकार म्हणून काम केले आहे. यासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भानू अथैया यांचे 15 ऑक्टोबर 2020 साली निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी आपली ऑस्कर ट्रॉफी अॅकॅडमी संस्थेला परत दिली होती.
दरम्यान, यावर्षी ‘टू किल अ टायगर’ हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्याला ऑस्कर 2024 साठी नामांकन मिळाले होते. मात्र यावेळी एकाही भारतीय चित्रपटाला पुरस्कार मिळालेला नाही.
हेही वाचा: