Oscar 2024 । ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो.
यावर्षीच्या 93व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच होणार आहे. हा पुरस्कार सोहळा कधी आणि कुठे पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. यंदाचा हा पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे.
विनोदवीर जिमी किमेल चौथ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करण्यासाठी उत्सुक आहेत. भारतात ‘ऑस्कर अवॉर्ड्स’ कधी, कुठे आणि कसे पाहू शकतात हे जाणून घ्या… । Oscar 2024
कुठे पार पडणार ऑस्कर 2024 सोहळा? । Oscar 2024
10 मार्च रोजी ऑस्कर 2024 हा पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. अमेरिकेतील रेड कार्पेटवर रविवारी रात्री हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. भारतात सोमवारी सकाळी 11 मार्च 2024 रोजी या पुरस्कार सोहळ्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे.
भारतात कसा पाहता येणार हा सोहळा? । Oscar 2024
ऑस्कर 2024 हा पुरस्कार सोहळा भारतात 11 मार्च 2024 रोजी सकाळी 4 वाजता पाहता येणार आहे. ‘डिस्ने प्ल हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सोहळा पार पडणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर बाबात घोषणा करण्यात आली आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट : अमेरिकन फिक्शन, अॅनाटॉमी ऑफ अ फॉल, बार्बी, द होल्डोव्हर्स, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून, मॅएस्ट्रो, ओपनहामयर, पास्ट लाइव्हज, पूर थिंग्ज, द झोन ऑफ इंटरेस्ट
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : जस्टीन ट्राइट (अॅनाटॉमी ऑफ अ फॉल), मार्टिन स्कोर्सेसे (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून), योर्गोस लँथिमोस (पूर थिंग्ज), जोनाथन ग्लेझर (द झोन ऑफ इंटरेस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अॅनेट बेनिंग (न्याड), लिली ग्लॅडस्टोन (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून), सँड्रा हूलर (अॅनाटॉमी ऑफ अ फॉल) कॅरी मलिगन (मॅएस्ट्रो) एमा स्टोन (बार्बी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रँडली कूपर (मॅएस्ट्रो), कोलमन डॉमिंगो (रस्टिन), पॉल जियामॅटी (द होल्डोव्हर्स), किलीयन मर्फी (ओपनहायरम) जेफ्री राइट (अमेरिकन फिक्शन)