Oscars 2024 | Nitin Chandrakant Desai – ऑस्कर पुरस्काराकडे कलाविश्व आणि चित्रपट दुनियेमध्ये सर्वात प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून याकडे पाहिलं जात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते.
ऑस्करची ती सोनेरी बाहुली आपल्या देखील हातात असावी याकरता प्रत्येक कलाकार प्रयत्नशील असतो. यंदाचा 96 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा 11 मार्च रोजी लॉस एंजिलिसमधील ‘डॉल्बी थिएटर’मध्ये पार पडला. | Nitin Chandrakant Desai
अनेक नामवंत कलाकारांना पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच यावेळी एक हृदय हेलावणारीही घटना घडली. या सोहळ्यात अनेक दिवंगत कलाकारांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचवेळी प्रसिद्ध आर्ट डिरेक्टर, दिवंगत ‘नितीन चंद्रकांत देसाई’ यांनाही ट्रिब्यूट देण्यात आला, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून, यामध्ये चित्रपटांमधील त्यांच्या योगदानाला उजाळा देऊन त्यांना ट्रिब्यूट सादर करण्यात आला. अकॅडमीच्या मंचावर मेमोरिअम नावाचा एक विशेष सेगमेंट सादर करण्यात आला. त्याच दरम्यान नितीन देसाई यांचे स्मरण करण्यात आले.
नितीन चंद्रकांत देसाई यांचे अकाली निधन… | Nitin Chandrakant Desai
चार वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते नितीन चंद्रकांत देसाई यांचे अकाली निधन हे हिंदी चित्रपटसृष्टीची अवस्था आणि दुर्दशा या दोन्हींचे अत्यंत दु:खद संकेत आहे.
शो ऑफच्या जीवनात मग्न असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील तमाम चित्रपट निर्माते आणि त्यांच्या कंपन्यांचे हे कटू सत्य आहे आणि हेही खरे आहे की, नितीन देसाई हे अनेक आठवडे कर्जबाजारी झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते.
त्यांचा स्वत:चा जीव घेण्याचा निर्णयही याचाच परिणाम असल्याचे मानले जात आहे. नितीन देसाई यांच्या कंपनी एनडी आर्ट वर्ल्ड लिमिटेडने 2016 आणि 2018 मध्ये ईसीएल फायनान्सकडून एकूण 185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
करोना कालावधीपूर्वीच त्याच्या पेमेंटमध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. जानेवारी 2020 मध्ये सुरू झालेल्या या समस्यांबद्दल नितीन चंद्रकात देसाई यांच्या काही जवळच्या मित्रांनाच माहिती होती.
दरम्यान, त्यांचा एन.डी स्टुडिओ हा सुमारे 43 एकर जागेत पसरला आहे. त्या स्टुडिओमध्ये सलमान खान, आमिर खान आणि शाहरुखसह अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांचे शूटिंग झाले आहे.
असे म्हटले जाते की, जेव्हा सलमान त्याच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा तो जवळपास 90 दिवस या स्टुडिओमध्ये राहिला होता.
सलमानने त्या स्टुडिओमध्ये ‘वॉन्टेड’ आणि ‘बॉडीगार्ड’चे शूटिंगही केले. तसेच जोधा अकबर, यासह अनेक प्रसिद्ध चित्रपटही येथे शूट करण्यात आले होते. आज देखील लोक हा स्टुडिओ पाहण्यासाठी येत-जात असतात. । Oscars 2024