बबिता फोगाटनं देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला तबलिगी जमातीला जबाबदार धरताना वादग्रस्त ट्विट केलं. त्यात बबितानं शुक्रवारी एक व्हिडीओ पोस्ट करून तबलिगींवर निशाणा साधला होता. भारतात करोना दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकावर तबलिगी जमात असल्याचं वक्तव्य तिने केलं होतं. तिच्या या वक्तव्यावर नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया घेत असून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही ट्विट करत बबिता फोगटला पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच काही मुद्दे सांगून याविषयी देखील जाब विचार असा सल्लाही दिला आहे.
बबीता जी @BabitaPhogat यह statistics भी देखें! क्या इन लाखों भक्तगण के corona test हुए हैं? कृपया इसपर भी टिप्पणी दें! और तबलिग़ी जमात के प्रोग्राम को दिल्ली पुलिस ने permission क्यूँ दी.. यह सवाल भी उठाएँ! बाक़ी आपके फ़ैन तो हम हैं ही! 🙏🏽🙏🏽😊😊 https://t.co/ngqi1yYWEv
— Swara Bhasker (@ReallySwara) April 17, 2020
स्वरा भास्करने ट्विट केले आहे,’बबिता जी, ही आकडेवारीदेखील पहा! या लाखो जणांच्या करोना चाचणी झाल्या असतील? कृपया यावर तुमचं मत काय आहे ते सांगा आणि तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला दिल्ली पोलिसांनी परवानगी कशी दिली हा प्रश्नदेखील नक्कीन उपस्थित करा. बाकी मी तर तुमची चाहती आहेच”, असं ट्विट स्वराने केलं आहे. बबिता फोगटने तबलिगी जमातवर निशाणा साधल्यानंतर सोशल मीडियावर काही हॅशटॅग ट्रेण्ड झाले यात काहींनी बबिताला पाठिंबा दिला होता. तर काहींनी मात्र तिच्यावर चांगलीच टीका केली आहे.