पुणे : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या जशी वाढत आहे त्याच प्रमाणात त्यातून बरे होणाऱ्यांची पण संख्या वाढत आहे. दरम्यान, शहरातील आणखी ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यांच्यावर पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात उपचार सुरु होते.
कोरोनामुक्त झालेले सर्वांचे १४ दिवसांनंतरचे दोन्ही नुमने निगेटीव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि टीमचे धन्यवाद सर्वांनी मानले. दरम्यान सध्या पुणे शहरातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता ३३ वर गेली आहे.