Bansuri Swaraj Net Worth| यंदा भाजपकडून दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बान्सुरी स्वराज यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. बन्सुरी स्वराज या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. मंगळवारी 30 एप्रिल रोजी बान्सुरी स्वराज यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, बान्सुरी यांच्याकडे 19 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.
बान्सुरी स्वराज यांची एकूण संपत्ती किती?
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, बान्सुरी यांच्याकडे 11.27 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता आहे.निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार बान्सुरी स्वराज यांचे राजधानी दिल्लीत तीन फ्लॅट आहेत. दोन फ्लॅट जंतर मंतर येथे आणि एक हेली रोड दिल्ली येथे आहे. तर त्यांच्याकडे दोन गाड्या आहेत. यामध्ये मागील वर्षी खरेदी केलेल्या मर्सिडीज बेंझचा समावेश आहे.
या कारची किंमत 84 लाख रुपये आहे, तर अन्य कार टोयोटाची किंमत 15 लाख रुपये आहे. बन्सुरी यांच्याकडे हरियाणातील पलवलमध्ये 99.34 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांनी 2022-23 च्या आयकर रिटर्नमध्ये त्यांचे उत्पन्न 68.28 लाख रुपये असल्याचे घोषित केले आहे. बन्सुरी यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत हा त्यांना वकील म्हणून मिळणारी फी आणि बँकेतील ठेवींचे व्याज असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हंटले आहे.
बान्सुरी यांचे शिक्षण –
बान्सुरी स्वराज यांचा जन्म 1982 मध्ये दिल्लीत झाला. त्यांनी इंग्लंडच्या वॉरविक विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. याशिवाय बान्सुरी यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी लंडनच्या बीपीपी लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली. बन्सुरी स्वराज यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्या दिल्ली बार कौन्सिलमध्ये सामील झाल्या. त्यांनी रिअल इस्टेट, करार आणि कर याप्रकरणाची अनेक गुन्हेगारी प्रकरणे हाताळली आहेत.