Delhi-NCR School Bomb Threat । बॉम्बच्या धमकीच्या ईमेलने दिल्लीतील सुमारे ६० पेक्षा अधिक शाळांना आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही माहिती शाळांकडून पालकांना कळताच पालकांनी शाळेत येत आपल्या मुलांना नेण्यासाठी गर्दी केली.
ज्या शाळांना ही धमकी मिळाली आहे त्यामध्ये द्वारकाच्या डीपीएस, मयूर विहारच्या मदर मेरी स्कूल आणि नवी दिल्लीच्या संस्कृती स्कूलसारख्या हायप्रोफाइल शाळांचा समावेश आहे. अग्निशमन विभागाला सकाळी सहा वाजता याची माहिती देण्यात आली, त्यानंतर दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण शाळेची झडती घेण्यात आली.
In regards to threat mails to some schools in Delhi, MHA (Ministry of Home Affairs) says there is no need to panic. It appears to be hoax call. Delhi Police and security agencies are taking necessary steps as per protocol. pic.twitter.com/gypUirWZYV
— ANI (@ANI) May 1, 2024
अशात केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत सांगितले की,’दिल्लीतील काही शाळांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी आज सकाळी देण्यात आली होती. मात्र, ही धमकी खोटी असण्याची शक्यता आहे.’ असं केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटलं आहे. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा योग्य ती पावले उचलत असून, घाबरून जाण्याची गरज नाही असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.
Delhi-NCR School Bomb Threat । नोएडा-ग्रेटर नोएडामधील इतर अनेक शाळांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे
मुलांच्या सुरक्षेचा विचार करून ज्या शाळांना धोका नाही अशा शाळांनाही सुटी जाहीर करण्यात आली. एस्टर पब्लिक स्कूल, ग्रेटर नोएडाच्या व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर केली.
Delhi-NCR School Bomb Threat । शाळांना धमकीचे आले ‘मेल’
1. द्वारकाची डीपीएस शाळा
2. रोहिणीची डीपीएस शाळा
3. वसंत कुंजची डीपीएस शाळा
4. नोएडाची डीपीएस स्कूल
5. दक्षिण पश्चिम दिल्लीची डीएव्ही शाळा
6. पूर्व दिल्लीची डीएव्ही शाळा
7. पितामपुराची DAV शाळा
8. नवी दिल्लीची संस्कृती शाळा
9. मदर मेरी स्कूल, मयूर विहार
10. पुष्प विहारची एमिटी स्कूल
11. नजफगढची ग्रीन व्हॅली शाळा