मुंबई – राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं 16 नोव्हेंबरला मुंबईत आणण्यात येणार असल्याची घोषणा केली. या वाघनखांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये अफझल खानाचा कोथळा काढला होता. अशात सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनख महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात लंडनहून भारतात येताच माध्यमांशी संवाद साधला.
माध्यमांशी बोलतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘वाघनख महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात लंडन येथे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तूसंग्रहालयाशी आमचा करार झाला आहे. ब्रिटनच्या सरकारची परवानगी घेऊन वाघनख भारतात आणण्याची तारीख ही त्यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितली जाणार आहे. वाघनख आणण्याची तारीख निश्चित झाल्यावर वाघनख आणण्यासाठी आम्ही सगळेचजण आवश्यक असल्यास परत एकदा लंडनला जाऊ. आमचा करार झाला असून वाघनखं महाराष्ट्रात नक्की आणणार, त्याची तारीख आपल्याला सांगितली जाईल.’
पहा व्हिडिओ
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात परत आणण्याच्या लंडन येथील ऐतिहासिक यशस्वी सामंजस्य करारानंतर भारतात आगमन झाले यावेळी विमानतळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला..#TigerClawMoU #WaghNakhMoU #LondonVisit #ChhatrapatiShivajiMaharaj pic.twitter.com/BJgg9p9jDj
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) October 11, 2023