मुंबई : भाजपचे नेते नारायण राणे नेहमीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतात. अशात खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक ट्वीटही केले आहे. त्यांच्या याच ट्विटवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी खोचक शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचे विधान केले आहे. “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असे अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.
अजित दादा मोठे नेते..
पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा.. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे..
राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले..
शाम सावंत सोडून..
माहिती असुदे दादा..
बस या वेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा..— nitesh rane (@NiteshNRane) February 24, 2023
यावर नितेश राणेंनी ट्वीटद्वारे प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, “अजितदादा मोठे नेते पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले. शाम सावंत सोडून. माहिती असुदे दादा..बस या वेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा.”
गेल्या वेळी बिचारा.. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला..
म्हणून ते काही होत का बघा..
राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले..
आपण काय फक्त भावी मुख्यमंत्री च्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात..
तुमचा आवडता
टिललु 😅@AjitPawarSpeaks— nitesh rane (@NiteshNRane) February 24, 2023
याचबरोबर, “गेल्या वेळी बिचारा. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होत का बघा. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री.. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात. तुमचा आवडता टिललु.” असेही नितेश राणेंनी म्हटले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत खोचक शब्दात टीका केली होती. आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले होते. याबाबत अजित पवारांनी विचारलं असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया दिली होती.