वाल्हे,(वार्ताहर)- सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील उपसरपंचपदी अमित अरुण पवार यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच दत्तात्रेय किसन पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर निवड करण्यासाठी सुकलवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संदेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक घेण्यात आली.
दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम शेंडगे यांनी जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य योगेश पवार, नितिन गावडे,वैजयंता दाते, ऊर्मिला पवार, अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते.
वाल्ह्याचे माजी सरपंच दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच अमित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योजक राहुल यादव, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र चिकणे, उपाध्यक्षा संध्या पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दिलीप पवार, अरुण पवार, दिगंबर पवार, ग्रामस्थ उपस्थित होते.