पिंपरी (प्रतिनिधी) – के. पी. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत भारतीय योग संस्था, नवचैतन्य हस्य क्लब आणि ज्येष्ठ नागरीक संघ कासारवाडी आदींच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या उत्तम जीवनाचे सहस्य या विषयीच्या मार्गदर्शन सत्रास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राजेश्वर काशिनाथ कलशेट्टी आणि सावित्री राजेश्वर कलशेट्टी यांनी काल दिनांक २९ एप्रिल रोजी योग हॉल कासारवाडी येथे मोफत जीवन बदलणारे सेमिनार आयोजित केले होते.
सेमिनारमध्ये, वक्त्यांनी उत्तम जीवन आणि उत्तम आरोग्य मिळवण्याच्या पद्धती डीकोड केल्या. कलशेट्टी हे यूएसए मधील नेतृत्व, व्यवसाय आणि आरोग्यामध्ये प्रमाणित प्रशिक्षक आहेत. त्यांनी जगताना येणाऱ्या समस्या व त्यावर मात करण्याचे उपाय छोटा व मार्मिक गोष्टीच्या माध्यमातून नागरिकांना पटवून दिल्या. साध्या व सोपे बदलातून जीवनाचा सकारात्मक बदलाचा राजमार्ग त्यांनी सांगितला.
या वेळी माजी नगरसेविका आशा शेंडगे, अंकुश भामे, विजय मानकर, सुहास बोरावके, प्रशांत तनपुरे आदी उपस्थित होते. राजेश्वर कलशेट्टी आणि सावित्री कलशेट्टी यांनी संयोजन केले. हा कार्यक्रम के. पी. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.