Chandrasekhar Bawankule – सुशीलकुमार शिंदेंना आम्ही कुठलीही ऑफर दिलेली नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे की, भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेंना ऑफर दिली नाही.
त्यांची भेट होणे ही वेगळी गोष्ट आहे. मात्र पक्ष म्हणून आम्ही कुठलीही ऑफर दिली नाही. आमच्या पक्षाला तशी गरज नाही, पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे.
आम्ही कुणालाही आमदारकी, खासदारकीसाठी पक्षात या असे म्हणणार नाही. परंतु मोदीजींचे नेतृत्व स्वीकारायला कुणी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असा प्रत्युत्तर त्यांनी दिले.