मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा सदस्य अपात्रता सुनावणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाकडून ३१ जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, नार्वेकर ७ दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान राहुल नार्वेकर २६ जानेवारी पर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल राखून ठेवणार असल्याची देखील माहिती आहे. राष्ट्रवादीची सुनावणी शिवसेनेच्या सुनावणी पेक्षा वेगळी असल्याने अधिकचा वेळ लागत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर बंद दाराआड झालेल्या कालच्या सुनावणीत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्या आहेत. एकूण पाच याचिका दोन गटांत एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २६ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील सुनावणीत साक्षीदार निश्चित केले जाणार आहे. १८ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात शेड्युल १० चा सेक्शन २(अ) अंतर्गत राष्ट्रवादीची सुनावणी घेण्यात येणार आहे. २अ अंतर्गत अजित पवार गटावर स्वतःहून राजकीय पक्ष सोडल्याने त्यांना अपात्र करावे अशी शरद पवार गटाची मागणी आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार आहे. राहुल नार्वेकर सात दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाकडून ३१ जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर २६ जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल राखून ठेवणार आहे. राष्ट्रवादीची सुनावणी शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा वेगळी असल्याने अधिकचा वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.