मुंबई – महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळख असणाऱ्या ‘महानंद’चे हस्तांतरण अखेर पार पडले. महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे देण्यात आलेला आहे. (Transfer of ‘Mahanand’, the apex body of co-operative milk societies in Maharashtra; Possession went to Mother Dairy of Gujarat)
ही प्रक्रिया दोन मे रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. महानंदच्या पुनरूज्जीवनासाठी राज्य सरकार मदर डेअरीला 253 कोटींचे सहाय्य करणार आहे. राष्ट्र दुग्धविकास मंडळातर्फे मदर डेअरी चालवली जाते.
महानंदची सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक होते. त्यामुळेच त्याचे हस्तांतरण करण्याचे निश्चित झाले होते. वास्तविक, महानंदचे हस्तांतरण करण्यात त्यांच्या संचालक मंडळाचा नकार होता. यामुळेच गुजरातमधील आनंद जिल्ह्यात हस्तांतरण करण्यासाठी संचालक मंडळ नसावे, अशी ट होती. दरम्यान, हस्तांतरणाच्या मुद्द्यावरून राज्यात सत्ताधारी – विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती.