कराड – काले (ता. कराड) येथील विनायक उत्तमराव पाटील यांची मंत्रालय मुंबई येथे साहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली. पाटील याने सप्टेंबर 2018 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षा दिली होती. या स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच लागला. त्याने महाराष्ट्रात तिसावा क्रमांक पटकावला.
यापूर्वी त्याने स्पर्धा परीक्षेतून नगरपालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम पाहिले. सध्या ते वाई येथे करनिर्धारण प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या निवडीबद्दल माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ऍड. उदयसिंह पाटील, जयसिंगराव पाटील, अविनाश मोहिते, कृष्णाचे संचालक दयानंद पाटील, पैलवान नाना पाटील, डॉ. अजित देसाई, पांडुरंग पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.