पॅनिक बटण बसवण्याच्या निर्णयावरुन वाहन नुतणीकरन नोंद काही काळ थांबवली-
पिंपरी – प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना केंद्र शासनाकडून पॅनिक बटण (आपातकालीन संदेश प्रणाली) आणि व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्याची सक्ती केली आहे. 1 एप्रिल 2019 त्याबाबतचा मेसेज व्हाट्सऍपवर आल्याने पिंपरीतील आरटीओ कार्यालयात काही काळ नुतनीकरण थांबवण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी त्याची शहानिशा केल्यानंतर पुन्हा कामकाजास सुरवात करण्याच्या सूचना दिल्या.
वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने परिपत्रक काढून 1 जानेवारी 2019 पासून प्रत्येक नव्या सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम आणि पॅनिक बटण सक्तीचे करण्यात आले आहे. त्यात काळया-पिवळ्या टॅक्सी, टुरिस्ट टॅक्सी व खासगी प्रवासी बस यांचा समावेश आहे. नव्याने येणाऱ्या वाहनांना ही प्रणाली बंधनकारक करण्यात आली असली तरी सध्या वापरात असलेल्या वाहनांबाबत निर्णय अद्याप झाला नाही. तो त्या-त्या राज्यांवर सोपवण्यात आला आहे. पॅनिक बटणामुळे आपातकालीन मदत मिळणार आहे. हे बटण दाबल्यानंतर पोलिसांना त्याचा मेसेज जाणार आहे. त्यामुळे गाडयांचा वेग, बेदरकारपणे वाहन चालवणे, ओव्हरटेक यावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. तसेच, वाहतूक कोंडी आणि अपघात झालेल्या वाहनांची नक्की माहिती मिळवण्यासाठी त्याची मदत होणार आहे.
पिंपरीतील आरटीओ आर्थिक नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर पॅनिक बटणाबाबत शासनाच्या वरिष्ठ पातळीवरून संदेश आले. केंद्राकडून तो निर्णय झाल्याने पुढील नुतनीकरणाची प्रक्रीया निरीक्षकांनी तत्काळ खासगी टॅक्सी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी थांबवण्यात आली. त्यामुळे सर्व टॅक्सी चालक आणि मालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्याची खातरजमा केल्यानंतर तूर्तास, असा कोणातही निर्णय आला नसल्याचे कळवण्यात आले. त्यामुळे नुतनीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी संबंधित मोटार वाहन निरीक्षकांना त्याची माहिती देवून पुढील कामकाज सुरु ठेवण्यास सांगितले.