लुधियाना – ज्येष्ठ पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे आज निधन झाले. त्या 68 वर्षांच्या होत्या. पंजाबमधील रायकोट येथे गुरुवारी दलजीत कौर यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंजाबी चित्रपटसृष्टीतील ‘हेमा मालिनी’ म्हणून त्या ख्यातनाम होत्या. दलजीत कौर यांनी ‘दाज’, ‘गिधा’, ‘पुट्ट जट्टन दे’, ‘रूप शकीनन दा’, ‘इशाक निमाना’, ‘लाजो’, बटवारा’, ‘वैरी जट्ट’, ‘पटोला’ आणि जग्गा डाकू अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर, अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
The beautiful Actress, Legend of Punjab #Daljeetkaur has sadly left us with her beautiful memories. May god bless her soul and she rest in eternal peace. 🙏🏼 pic.twitter.com/ZgOkv2rV3Z
— King Mika Singh (@MikaSingh) November 17, 2022
गायक मिका सिंग यांनी ट्विट केले की, पंजाबची सुंदर अभिनेत्री, लीजेंड दलजीतकौर या अनेक चांगल्या आठवणी मागे ठेऊन गेल्या आहेत. दलजीत कौर यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतले. अभिनेते सतीश शहा हे त्यांचे बॅचमेट होते.
अयोध्यानगरीत महाराष्ट्र भक्त निवास उभारण्यात यावे; विधानसभा अध्यक्षांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दलजीत कौर यांचे स्मरण करून, सतीश शहा यांनी ट्विटरवर लिहिले आहे, “एक प्रिय मैत्रिण आणि बॅचमेट दलजीत कौर या जुन्या काळातील पंजाबी प्रख्यात अभिनेत्रीचे या महिन्यात 17 तारखेला निधन झाले, त्यांना आमची भावपुर्ण श्रद्धांजली.