Ameen Sayani Passes Away। मनोरंजन जगतात पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. रेडिओच्या जगातील आवाजाचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचे निधन झालंय. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचा मुलगा राजिल सयानी यांनी दुजोरा दिला आहे.
अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी याला त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. राजिलसयानी यांनी माध्यमांना वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की अमीन सयानी यांना बुधवारी सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. , त्यानंतर त्यांना तातडीने एचएन रिलायन्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
उद्या होणार अंत्यसंस्कार Ameen Sayani Passes Away।
अमीन सयानी यांच्या जाण्याने रेडिओच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या खास आवाजातील ‘बहनों और भाईयो आप सुन रहे है…’ ही वाक्य आजही सिने रसिक, रेडिओ प्रेमींच्या मनात घर करुन आहेत. अमीन सयानी यांच्यावर 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अमीन सयानी यांना वृद्धापकाळामुळे उच्च रक्तदाब आणि अन्य शारीरिक व्याधींनी ग्रासले होते. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पाठीच्या दुखण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांना चालताना वॉकर वापरावा लागत असे. रेडिओ सिलोन आणि विविध भारती चॅनलवरील ‘बिनाका गीतमाला’ या त्यांच्या कार्यक्रमाने सर्व विक्रम मोडीत काढले होते. अमीन सयानी यांनी जवळपा 19 हजार जिंगल्सना आवाज दिला होता. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये झाली होती.
रेडिओवर 1952 साली सुरु झालेल्या ‘गीतमाला’ या कार्यक्रमाने अमीन सयानी यांना प्रसिद्धीची शिखरावर नेऊन ठेवले. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी होती की, रेडिओच्या ऑफिसमध्ये अमीन सयानी यांच्यासाठी दर आठवड्याला जवळपास 65 हजार पत्रं यायची. या गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला फक्त 7 गाणी होती. ही संख्या नंतर 16 पर्यंत वाढवण्यात आली. त्यावेळी अमीन सयानी दिवसाला 12 तास काम करायचे.
या पुरस्कारांनी सन्मानित Ameen Sayani Passes Away।
अमीन सयानी यांना रेडिओ जगतात त्यांच्या योगदानासाठी अनेक मोठे आणि प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
– लिव्हिंग लिजेंड अवॉर्ड (2006)
– गोल्ड मेडल (1991) – इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझेशनकडून
– पर्सन ऑफ द इयर पुरस्कार (1992) – लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्स
– कान हॉल ऑफ फेम पुरस्कार (2003) – रेडिओ मिर्ची कडून