Munavwar Rana – प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांचे रविवारी येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रूग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ते दीर्घकाळापासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते.
राणांची मुलगी सुमैया राणा यांनी पीटीआयला सांगितले की, रविवारी रात्री उशिरा तिच्या वडिलांचे रुग्णालयात निधन झाले आणि सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
१९५२ मध्ये रायबरेली येथे जन्मलेल्या मुनव्वर राणा यांना२०१४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कवितांमध्ये साध्या सोप्या शब्दांचा वापर असल्याने त्यांच्या कविता सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली.
राणा यांच्या ‘मा’ या कवितेला उर्दू साहित्यात विशेष स्थान आहे. राणाच्या कवितेतील एक ओळ शेअर करत, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक्स वर एका पोस्टमध्ये कवीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.