क्रिकेटच्या जगात मोठया खेळाडूंचे विक्रम अनेकवेळा अनपेक्षित असलेल्या देशाच्या खेळाडूंकडून मोडण्यात आलेले आहेत. आताही असेच काहीसे घडले आहे. युएईच्या १७ वर्षीय अयान अफझल खानने नेपाळविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अफझल खानने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत मोठ्या विक्रमला गवसणी घातली आहे.
या सामन्यात ८व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अफझल खानने ६३ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५४ धावा केल्या होत्या. त्यामुळे यूएई संघाने ९ गडी गमावून १७६ धावा केल्या. संघासाठी अफझल यानेच सर्वाधिक धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
“ही जागा अत्यंत खराब असून हे लज्जास्पद…”या कारणामुळे माजी खेळाडू संतापला
प्रत्युत्तरात नेपाळच्या संघाने आसिफ शेख (नाबाद ८८) आणि ज्ञानेंद्र मल्ला (६४ धावा) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ४०.१ षटकांत ४ गडी गमावून सामन्यात विजय मिळवला. युएईकडून गोलंदाजीत अफझलने १० षटकात २७ धावा देत १ बळी घेतला. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफझल खानने १४ धावांत ४ बळी घेतले होते, त्यामुळे त्याचा या प्रकारातील पदार्पण सामना होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त धावा करणारा आणि एका सामन्यात ४ विकेट घेणारा अफझल खान हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. वयाच्या १७ वर्षे ३ दिवसांत हा पराक्रम करून त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. अफझल खानने १७ वर्षे २१० दिवस वयात हा पराक्रम करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद अमीरचा विक्रम मोडला. तर सचिन तेंडुलकरने १८ वर्षे १८१ दिवसांत हे काम केले होते.