Babanrao Dhakne Passes Away : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (Babanrao Dhakne) यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्युमोनिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर (Ahmednagar) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवले होते. मागील 12 दिवसांपासून न्युमोनिया आजारावर ते उपचार घेत होते. मात्र सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. बबनराव ढाकणे हे माजी केंद्रीय मंत्री असून ते चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते. 1994 साली महाराष्ट्रात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राहिले होते.