वाघोली – कोलवडी तालुका हवेली येथील शिवशक्ती विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. या सोसायटीच्या चेअरमनपदी अमर बाळासो गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रातील नेते चंद्रकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून तळपे साहेब व सचिव दत्तात्रय गायकवाड यांनी कामकाज पाहीले.
निवडी नंतर माजी चेअरमन शामराव गायकवाड यांच्या हस्ते अमर गायकवड यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी संचालक यशवंत स.सा. का रामदास गायकवाड, मिलापचंद गायकवाड, अशोकराव गायकवाड, माजी सरपंच सतिष गायकवाड,जयसिंग गायकवाड, शशिकांत गायकवाड,बाळासो भाडळे, दिलीप गायकवाड, नानासाहेब मुरकुटे, विश्वास गायकवाड, सखाराम गायकवाड, मानसिंग गायकवाड,
विकास कांचन, शंकर मदने, मल्हारी गायकवाड, विनायक गायकवाड, अशोक गायकवाड, किरण शितोळे, सचिन गायकवाड, विकास गायकवाड, संभाजी गायकवाड, चिंतामणी मदने, शरद गायकवाड, किरण साळुंखे सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल पाटील गायकवाड यांनी केले. आभार रमेश मदने यांनी मानले.