मुंबई – कांतारा या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातलाच शिवाय वेगळ्या आशयामुळॆ प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. चित्रपटातील नायक रिषभ शेट्टी यामुळे रातोरात स्टार झाला. देशातील अनेक बड्या कलाकारांनी कांताराचे कौतुक केले. बॉलिवूडसह हिंदी सिनेसृष्टीने देखील रिषभ शेट्टीसह संपूर्ण कांतारा टीमचे कौतुक केले. कांतारामध्ये रिषभसोबत दिसलेली अभिनेत्री सप्तमी गौडा आता लवकरच बॉलिवूड चित्रपट झळकणार आहे.
कमी बजेटमध्ये भरगोस यश मिळवल्याने शिवाय छप्पर फाड कमाई केल्याने कांताराची सर्वत्र चर्चा होती. यापूर्वी पडद्यावर कधीही न दिसलेला विषय रिषभ शेट्टीने हाताळून सिने जगतात अक्षरशः धमाका केला होता. अभिनेत्री सप्तमीने देखील त्याला तितकीच सुंदर साथ दिली होती. सप्तमीच्या कांतारामधील अभिनयाचे देखील सर्वांनी कौतुक केले होते.म्हणुनच काश्मीर फाईल्स फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तिला आपल्या आगामी चित्रपट कास्ट केल्याचे समजते.
विवेके अग्निहोत्री यांनी स्वतः ट्विट करून सप्तमीचे आपल्या आगामी चित्रपटामध्ये स्वागत केले आहे. द वॅक्सिन वॉर असं या चित्रपटाचे नाव आहे. विवेक अग्निहोत्री यांनी वॅक्सिन वॉरची घोषणा केली, तेव्हापासून या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली होती. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे, या चित्रपटाच्या सेटवरील नुकताच एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता ज्यामध्ये सर्व कलाकार शूट संपल्यानंतर जय श्री रामच्या घोषणा देताना दिसले होत.
Welcome Sapthami.
Your role in #TheVaccineWar will touch many hearts. https://t.co/aVsCGlmwgX— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) January 13, 2023
अनुपम खैर यांच्या करिअरमधील 534 वा हा चित्रपट असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच येत्या 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगूसह तब्बल दहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.