वाघोली (प्रतिनिधी) – भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आधार सोशल फाउंडेशन तर्फे पुणे येथे ह.भ.प. नलिनी आशिष वायाळ-गावडे यांना पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते अटल साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिरसवडी तालुका हवेली येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या कन्या नलिनी वायाळ यांनी महिलांच्या संदर्भातील अनेक विषयांचे व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन केले आहे.
यात जिजाऊ चरित्र, आई एक संस्कार केंद्र,महिला सुरक्षा,महिला सक्षमीकरण,किशोरवयिन मुलींचे आरोग्य (मानसिक आणि शारीरिक ), महिलांचे मानसिक,शारीरिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य,कुटुंब प्रबोधन आदी विषयांचा समावेश आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, आमदार सुनील कांबळे, महेश करपे, मिलिंद देवल,
राजेश पांडे, हेमंत रासने, शैलेश टिळक,राजेंद्र हिरेमठ, आयोजक दिलीप काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.नलिनी वायाळ यांना अटल साधना पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी उपसरपंच मंगेश गावडे, शिरसवडी, गावडेवाडी, बिवरी, ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.