Weather Alert Rain Update – दोन दिवस (9 आणि 10 मे) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
9 मे रोजी पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जन ा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. तसेच अहमदनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
#WeatherUpdate
हवामान अंदाज : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता… pic.twitter.com/FAWx9SP4Dr— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 9, 2024
10 मे रोजी पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, नांदेड, लादूर, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासाह मेघ गर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.