मेंदूज्वर पीडितांना खासदारांची मदत

पाटणा – बिहारमध्ये मुझफ्फरपूरमधील चमकी बुखार म्हणजेच मेंदूज्वराने 154 बालकांचा मृत्यू झाला आहे. आता ज्या बालकांना हा ज्वर झाला आहे, त्यांच्यासाठी भाजप खासदारांनी पुढाकार घेत उपचारासाठी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारमध्ये भाजपचे 17 खासदार आहेत त्यांनी ही मदत जाहीर केली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा आणि पीआयसीयू बनवण्यात मदत होईल.

केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि बिहारचे भाजप प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी हा निधी देऊन या कार्याची सुरुवात केली आहे. खासदार डॉ. संजय जयस्वाल हे कार्याचे समन्यव साधतील. मुझफ्फरपूरसह शेजारी जिल्हे वैशाली, पूर्वी चंपारणमध्येही या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.