गोंदिया – गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर ट्रेनच्या धडकेत दोन हरिणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान पिंडकेपार-हिरडामाली रेल्वे मार्गावर घडली. या घटनेमुळे वन्य प्रेमिंनी आणि गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
गोंदिया-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग नागझिरा अभयारण्यातून जातो. हिरडामाली ते गोंगली रेल्वे स्थानकापर्यंत दाट जंगल परिसर असल्याने अनेकदा जंगली प्राणी जंगलातून या रेल्वे मार्गाच्या पलिकडे ये-जा करत असतात. त्यामुळे ट्रेनच्या धडकेत अनेकदा अनेक वन्यजीवांचा मृत्यू होत आहे. गोंदियाकडून चंद्रपूरकडे लोकल ट्रेन जात असताना हिरडामाली-पिंडकेपार दरम्यान रेल्वे मार्ग ओलांडत असताना या दोन हरीण रेल्वेच्या धडकेत मृत्यु झाला आहे.