“जी-7′ शिखर परिषद रिसॉर्टवर घेण्यास ट्रम्प यांचा नकार

वॉशिंग्टन : पुढील जी -7 शिखर परिषद फ्लोरिडातील आपल्या गोल्फ क्‍लबमध्ये होणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या रिसॉर्टवर “जी-7′ शिखर परिषद घेण्याचे ठरवल्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले होते.

व्हाईट हाऊसचे प्रभारी “चीफ ऑफ स्टाफ’ मिक मुलवने यांनी गुरुवारी शिखर परिषदेसाठी ट्रम्प यांच्या रिसॉर्टची जागा जाहीर केली होती. मात्र त्यामुळे ट्रम्प यांच्या कॉंग्रेसमधील डेमोक्रेटिक विरोधक भडकले. त्यांनी या निर्णयाला अध्यक्ष्यांच्या भ्रष्टाचाराची सर्वात निर्लज्ज उदाहरण म्हणून संबोधले. डोराल येथे हा कार्यक्रम आयोजित केल्याने अमेरिकेच्या नेत्याला बाह्य प्रभाव येऊ नये म्हणून परदेशी आणि देशांतर्गत कार्यक्रमांच्या आयोजनाच्या निकषांचे उल्लंघन होईल, अशी टीका व्हायला लागली होती.

प्रसार माध्यमे आणि डेमोक्रॅट यांच्या टीकेमुळे आम्ही यापुढे मियामी येथील “ट्रम्प नॅशनल डोराल’मध्ये 2020 मधील “जी -7′ चा विचार करू शकत नाही, असे ट्रम्प यांनी ट्‌विट केले.

आम्ही त्वरित कॅम्प डेव्हिड या दुसऱ्या ठिकाणाची चाचपणी सुरू करू, असे मुलवने यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. दक्षिण फ्लोरिडा हे ठिकाण अमेरिकेच्या डझनभर ठिकाणांमधील सर्वोत्तम स्थान आहे. त्यायोगे पुढील वर्षी 10 ते 12 जून रोजी होणाऱ्या “जी-7′ परिषदेसाठी विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.