लुफ्थान्सा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप

जर्मनीतील डझनवारी विमानफेऱ्या रद्द

फ्रॅंकफर्ट (जर्मनी) : लुफ्थांसाच्या चार सहायक विमान कंपनीच्या केबिन कर्मचाऱ्यांनी रविवारी दिवसभराचा संप केला. त्यामुळे जर्मन विमानतळांवर डझनभर विमानांची उड्डाणे रद्दबातल झाली. यूएफओ केबिन कर्मचाऱ्यांच्या युनियनची विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबरची बैठक प्रारंभी सकाळी 5:00 ते सकाळी 11: 00 पर्यंत चालली होती. पण लुफ्थान्साच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य न केल्यामुळे संप मध्यरात्रीपर्यंत चालला.

युरोव्हिंग्ज, जर्मनविंग्स, सनएक्‍सप्रेस आणि सिटीलाईनवर औद्योगिक कारवाईमुळे हॅम्बुर्ग विमानतळावर किमान 12 विमानंचे उड्डाण रद्द करण्यात आले. ड्यूसेल्डॉर्फ आणि कोलोन-बॉन यांच्याप्रमाणेच देशातील सर्वाधिक व्यस्त असलेल्या फ्रॅंकफर्ट विमानतळावरही अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. यूएफओने लुफ्थान्सा समूहाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

फ्लॅगशिप एअरलाइन्सच्या विमानसेवेला कंपनीने दोन टक्के वेतनवाढ अनपेक्षितपणे दिल्यानंतर युनियनने लुफ्थांसा कामगारांना रविवारीच्या संपामध्ये सामील होण्याची योजना रद्द केली होती. परंतु अन्य मागण्या अद्याप पूर्ण केल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे पाचही विमान कंपन्यांमधील सोमवारच्या चर्चेनंतर पुढील कारवाई होण्याची शक्‍यत “युएफओ’ने वर्तवली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)